खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील कुळवंडी-देऊळवाडी येथील काळकाई मंदिराजवळ असलेले आंब्यासह पिंपळाचे झाड सोमवारी रात्री 8.50च्या सुमारास अचानक पेटल्याने खळबळ उडाली. या बाबत नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
या ठिकाणी आंब्यासह पिंपळाच्या झाडाला लागलेल्या आगीचा भडका उडाल्याने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आले. त्यानुसार अग्निशमन केंद्रातील फायरमन दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय घाग, वाहनचालक गजानन जाधव घटनास्थळी पोहून शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.
खेडमध्ये पिंपळाच्या झाडाने घेतला पेट
