रत्नागिरी:-शहरानजीकच्या आरटीओ रेल्वे पुलावरील रूळावर 18 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े. रिया रावसाहेब रणदिवे (18, ऱा शांतीनगर रसाळवाडी) असे मृत तरूणीचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया ही 18 मार्च 2024 रोजी मैत्रिणीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यास जात असल्याचे सांगून सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडल़ी. दरम्यान रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने नातेवाईकांना या बाबत तिची चिंता वाटू लागल़ी. रिया हिची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांकडून मित्र परिवार यांच्याशी संपर्क साधण्यात आल़ा. मात्र रिया हिचा कोणताही थांगपत्ता लागू शकला नाह़ी. दरम्यान या बाबत रिया हिच्या नातेवाईकांकडून रत्नागिरी पोलिसांत खबर देण्यात आल़ी. त्यानुसार रिया हिचा शोध घेत असताना तिचा मृतदेह हा उपप्रादेशिक कार्यालय येथील रेल्वे रूळावर आढळल़ा. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े.
नाचणेतील 18 वर्षीय तरूणीचा रेल्वे रूळावर आढळला मृतदेह
