चिपळूण:-दिवा-चिपळूण या रेल्वेगाडीत पवाशाचा मोबाईल चोरणाऱया चोरट्यास मंगळवारी प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अमित तुळशीराम गायकवाड (32, दिवा-मुंबई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुनील विठोबा कदम (रेल्वे पोलीस-चिपळूण रेल्वे स्थानक) यांनी दिली. दिवा-चिपळूण ही रेल्वे रात्री चिपळूण रेल्वेस्थानकादरम्यान आली असता अमित हा प्रवाशाचा मोबाईल चोरत होता. त्याचक्षणी हा प्रकार त्या प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडून प्रवाशांनी चिपळूण रेल्वेस्थानक पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसानी चिपळूण पोलिसाच्या ताब्यात दिल्यानुसार, अमित याला अटक करण्यात आली. अमितने 3 हजार व 2 हजार किंमतीचे दोन चोरलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकन्या आंबेरकर करीत आहेत.
रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडले
