खेड/प्रतिनिधी:- खेड शहरातील गुलमोहर पार्क येथील राहुल कन्स्ट्रक्शन यांच्या घरासमोरील डांबराच्या ड्रमसह टायर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. येथील नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यानी एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
सायंकाळच्या सुमारास आग लागल्याचे नजीकच्या नागरिकांच्या निदर्शनास येताच तातडीने नगर परिषदेचे अग्निशमक दलातील कर्मचाऱ्याना कळवल्यानंतर तातडीने ते घटनास्थळी पोहोचले. एका तासातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत डांबराचे ड्रम व टायर जळून मोठे नुकसान झाले.
खेडमध्ये डांबराच्या ड्रमला आग लागून टायर जळून खाक
