रत्नागिरी:-शहरातील पेठकिल्ला येथून प्रात:विधीसाठी गेलेला 24 वर्षीय तरूण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आह़े. किल्ला परिसरात या तरूणाचा मोबाईल व चप्पल आढळून आल्य़ा आहेत. असे असतानाही या तरूणाचा कोणताही थांगपत्ता लागू शकलेला नाह़ी. ग्रामस्थांकडून या तरूणाचा शोध घेण्याचे काम केले जात आह़े.
स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 24 वर्षीय तरूण हा सकाळी 8 च्या सुमारास प्रात:विधीसाठी गेला होत़ा. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाह़ी.
रत्नागिरी पेठकिल्ला येथून तरूण बेपत्ता
