संगमेश्वर:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बसस्थानकाजवळ झालेल्या राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कार अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताबाबत बस चालक अर्जून अण्णासाहेब भोगडे (रा. देवरुख) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. राज्य परिवहन महामंडळाची करजुवे ते संगमेश्वर बस घेऊन अर्जून अण्णासाहेब भोगडे हे संगमेश्वरकडे येत होते. या दरम्यान गोव्याहून मुंबईच्या दिशेने मारिओ भिंगेस (बांद्रा-मुंबई) हे कार घेऊन जात असताना संगमेश्वर बसस्थानकप्जवळ त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने मारिओ यांचा कारवरील ताबा सुटून कार बसला जाऊन धडकली. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
अपघातप्रकरणी कार चालक मारिओ यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमेश्वरातील कार-बस अपघात प्रकरणी,कार चालकावर गुन्हा
