खेड / प्रतिनिधी:-कोकण मार्गावर मडगावहून मुंबईाया दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्स्पेसवर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी एका डब्यातील खिडकी काही फुटल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेनंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचून परिस्थिती पाहणी केली. रेल्वे पोलिसांकडून अज्ञाता कसून शोध सुरू असल्यो समजते. 10104 क्रमांकाच्या मडगाव-सीएसएमटी मुंबई मांडवी एक्स्पेसवर अचानक अज्ञाताने दगडफेक केल्याने प्रवाशांमध्ये एका खळबळ उडाली.
या एक्स्पेसच्या ए वन-29 डब्याच्या खिडकीवर झालेल्या दगडफेकीत कुठल्याही प्रवाशाला जखमा झालेल्या नाहीत. मात्र खिडकी का फुटल्याचे समोर आले आहे. ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले. त्यानुसार रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
उशिरापर्यंत दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा रेल्वे पोलिसांकडून कसून शोध सुरू होता. मात्र, ती व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकाराने प्रवासी सुरक्षितता ऐरणीवर आली असून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.
खेडमध्ये धावत्या ट्रेनवर दगडफेक, काच फुटली
