देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे माऊली बालाजी देवरुख ग्रुपच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत खेर्डीच्या सचिन म्हादे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरले.
पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूल समोरील मैदानात स्पर्धेच्या थरार रंगला. स्पर्धेत ९८ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम व प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत खेर्डीच्या सचिन अशोक म्हादे प्रथम क्रमांक, दिलीप बाबू दिंडे (वारूळ) द्वितीय क्रमांक, साहिल सुरेश चाळके (चिंचघरी)तृतीय क्रमांक, प्रेम प्रदीप कदम (आवाशी)चतुर्थ क्रमांक तर ओंकार चंद्रकांत हुमणे(आगवे) यांच्या बैलगाडीने पाचवा क्रमांक पटकावला.
विजेत्यांना रोख रक्कम, चांदीची ढाल, सन्मानचिन्ह व सहभागी बैलगाडा मालकांस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेप्रसंगी माजी राज्यमंत्री रविंद्र माने,माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याध्यक्ष सुरेश बने, साडवली सरपंच संतोष जाधव, माऊली बालाजी ग्रुप चे अध्यक्ष प्रसन्न सार्दळ, आबा घोसाळे, सूर्यकांत सावंत, उमेश देसाई, राजेश जाधव, पपु नाखरेकर, रमेश पंदेरे, बापू डोंगरे, सुबोध पेडणेकर, रविंद्र सावंत, अजय सुर्वे, मुजीब साटवीलकर, नंदन डोंगरे, योगेश चव्हाण, किरण जाधव, मंदार गानू उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माउली बालाजी ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. हजारो रसिक प्रेक्षक याठिकाणी उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्याबद्दल बैलगाडा चालक मालक, रसिक प्रेक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले.
देवरुखातील राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत चिपळूणच्या सचिन म्हादे यांचा प्रथम क्रमांक
