दापोली:-दापोली तालुक्यातील फणसू निकमवाडी येथे रघुनाथ बाळू मांडवकर याने अवैधरित्या गावठी दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रघुनाथ मांडवकर (फणसू-निकमवाडी) हा शनिवारी संध्याकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास फणसू-निकमवाडी येथे संशयितरित्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यायाकडे विनापरवाना एकूण 1660 रुपये किंमती निळ्या रंगाच्या 35 लिटर मापाच्या प्लास्टिक कॅनमध्ये 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. याप्रकरणी मांडवकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्णै येथे रविवारी संध्याकाळी हर्णै बायपास जवळ समुद्रकिनारी झाडा-झुडपाच्या आडोशाला रुपेश सुरेश वाघमारे (42, हर्णै, मोठी गोडीबाव) हा संशयितरित्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ विनापरवाना सुमारे 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. याची फिर्याद दापोलो पोलीस कॉन्स्टेबल पंकज फुलचंद पवार यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार रुपेश वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
अवैधरित्या दारू बाळगल्याप्रकरणी दापोलीत दोघांवर गुन्हा
