रत्नागिरी:-स्टेट इनोव्हेशन अन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2023 चा अंतिम निकालामध्ये मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरीचे उपक्रमशील शिक्षक संतोष गार्डी यांच्या शिकू आनंदे संबोध भूमितीचे… या नवोपक्रमाची निवड सर फाऊंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2023 या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी झाली.
स्टेट इनोव्हेशन अँन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2023 चा अंतिम निकाल राज्य समन्वयक सिध्दाराम माशाळे, बाळासाहेन वाहा, हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण धानी जाहीर केला. यामध्ये देशभरातल्या सर्वोत्तम नवोपक्रमांची निवड करण्यात आली. यामध्ये मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरीचे उपक्रमशील शिक्षक संतोष गार्डी यांच्या शिकू आनंदे संबोध भूमितीचे… या नवोपकमांचा समावेश आहे. मुलांचे भूमितीचे मूलभूत संबोध वृढ व्हावेत व भूमिती था विषयाचे आकलन चांगले व्हावे. भूमिती वेगवेगळ्या आनंददायी कृतीतून शिकता यावे यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये माझी मदत आकृती सुबक, वाटू शिल्प, नाटयीकरण, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रदर्शन, चित्रकला, चला मोजू लांबी व रुंदी, मदत कर सराव करू. या सारख्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची मोडणी शिकू आनंदे संबोध भूमितीचे या नवोपक्रमात करण्यात झाली होती. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची भूमितीतील शैक्षणिक प्रगती वाढण्यास मदत झाली. विद्यार्थी स्वत कृत्ति करण्यास प्रेरित झाले. संतोष गार्डी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम नियमितपणे राबवतात. सर्व विद्यार्थी उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी उपक्रमशील शिक्षक संतोष गार्डी यांच्या नवोपक्रमाची निवड
