संगमेश्वर प्रतिनिधी:-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बस स्थानक एस टी बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान घडला.
अपघाताबाबत बस चालक अर्जुन अण्णासाहेब भोगडे राहणार देवरुख यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. राज्य परिवहन महामंडळाची करजुवे ते संगमेश्वर बस क्रमांक MH 14 BT 2057 ही घेऊन अर्जुन अण्णासाहेब भोगडे हे संगमेश्वर कडे येत होते या दरम्याने गोव्याहून मुंबईच्या दिशेने मारिओ भिंगेस ,बांद्रा, मुंबई हे कार घेऊन जात असताना संगमेश्वर बस स्थानक जवळ त्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने मारिओ यांचा कारवरील ताबा सुटून कार बसला जाऊन धडकली या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे ,कोलगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे बस – कारचा अपघात
