चिपळूण:- बांधकाम व्यावसायासाठी लागणारे 9 हजाराचे लोखंडी साहित्य चोरीस गेल्याची घटना 2 ते 4 मार्च या कालावधीत उक्ताड परिसरात नासीर खोत यांच्या बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी घडली होती. पोलिसाच्या तपासाअंती दोन महिलांना याप्रकरणी अटक करण्यात असून सोमवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विमल अरुण जुवे (30, उक्ताड), वर्षा विनोद गोसावी (30, खेंड) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. नासीर खोत यांच्या बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्यालयाशेजारी हा चोरी पकार घडल्यानंतर यामध्ये 6 हजार िकंमतीच्या लोखंडी सळ्या, 3 हजार रूपये किंमतीच्या लोखंडी चौकोनी रिंग असे 9 हजार रूपये किंमताया लोखंडी साहित्याचा समावेश होता. या चोरी प्रकरणी जावेद अब्दुल गणी पोशरकर यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसाकडून या चोरीचा तपास सुरु असताना विमल जुवे, वर्षा गोसावी यांनी ही चोरी केल्याचे पुढे येताच पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. सोमवारी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.