गुहागर/उदय दणदणे:-कोकणात शिमगोत्सवात रूढी परंपरे नुसार अनेक गावांमध्ये नमन (खेळे) लोककला अविरत जोपासली जाते.नमनाचं जागर अर्थात कलेचं माहेरघर गुहागर तालुक्याला देवखेळयांची फार मोठी परंपरा आहे,येथील रूढी परंपरे नुसार प्रतिवर्षी अनेक गावातून ग्रामदैवतेचे देवखेळी गाव सीमेबाहेर गावभोवणीसाठी ग्रामदेवतेच्या श्रद्धेने अगदी अनवाणी बाहेर पडत असतात,सदर देवखेळी रात्री उशिरापर्यंत तालुक्यात गावभोवणी घेत असताना त्यांना अनेक गावांमध्ये वस्तीला राहावे लागते.
त्याचबरोबर शिमगोत्सवात अनेक गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत नमन लोककला सादर करत असताना वातावरणात होणारे नैसर्गिक बदल,संसर्गजन्य आजार त्याचबरोबर अपघात,विषारी जिवाणूंपासून होणारे विकार तसेच अन्य प्रकारच्या प्राथमिक आजारांवर गाव भोवनीसाठी बाहेर पडणाऱ्या देवखेळे व नमन कलाकार यांना तात्काळ उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी नमन लोककला संस्था (रजि) कार्यक्षेत्र-अखंड भारत संलग्न: गुहागर तालुका शाखेच्या वतीने व गुहागर तालुक्यातील डॉक्टरांच्या विशेष सहकार्याने शिमगोत्सव दरम्यान दिनांक-१५ ते २४ मार्च-२०२४ रोजी पर्यंत गुहागर तालुका शाखेत नोंदणी झालेल्या नमन मंडळ,गाव मंडळ यातील कलाकार देवखेळयांना प्राथमिक/प्रथमोपचार मोफत उपलब्ध करण्यात आले असून पुढील डॉक्टरांच्या दवाखान्यात देवखेळी कलाकारांना ही सेवा उपलब्ध करण्यात आलीआहे.डॉ.राजेंद्र विष्णू पवार (शृंगारतळी) संपर्क:९४२१३२२२२२/९९२१९८९९५९ ,डॉ.निलेश निवृत्ती ढेरे (गुहागर)संपर्क :७४२०८३५९००,डॉ.बाळासाहेब ढेरे (पालशेत) संपर्क:९६२३५८७४०४ /९४०५२३१०७५ ,डॉ.प्रमोद हंचाटे (पालपेणे) संपर्क:९६८९४७०८००,डॉ.गौरव तुकाराम निवाते-(आबलोली) संपर्क:९४०३३६३३२१,डॉ.स्नेहल गौरव निवाते (आबलोली)संपर्क:९४०३३६३३२१,डॉ.तेजश्री तुकाराम निवाते (आबलोली) संपर्क:९४०३३६३३२१,डॉ.राहुल रामदास चव्हाण (पाटपन्हाळे)संपर्क:९४२०३३२४३५,डॉ.राकेश कापले (अडूर )संपर्क-८८०६७४७४६४ डॉ.अक्षय शिरगावकर (वेळणेश्वर)-संपर्क-९९२३४०१४८१/८३१७२४४५७८अधिक माहितीसाठी पुढील प्रतिनिधींनीकडे संपर्क साधावा.उदय दणदणे-८२७५६२७६३६,अमितकाताळे-९८७०५८३२१६,सुधीर टाणकर -७७५६०३७२८८,प्रशांत भेकरे- -९५९४९८४२०९
तरी नोंदीत झालेल्या गुहागर तालुक्यातील नमन- खेळे, देवखेळी कलाकारांनी सदर सेवेचा आवश्यक लाभ घ्यावा.
असे आवाहन नमन लोककला संस्था रजि.संलग्न:गुहागर तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले असून कोकणची कला संस्कृती नमन-खेळे लोककला संवर्धन हेतू सदर उपक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे गुहागर तालुक्यातील डॉक्टर बंधू भगिनींचे नमन लोककला संस्था संलग्न:गुहागर तालुका शाखा अध्यक्ष-सुधाकर मास्कर,सचिव-संदिप कानसे यांनी आभार मानले आहे.