चिपळूण:-तालुक्यातील कादवड-कातकरवाडीतील नववी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या दोन शाळकरी मुली शनिवारी कपडे धुवण्यासाठी गेल्या असताना तिवरे नदीच्या पात्रात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत्यूचे कारण अद्याप पुढे आलेले नाही, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होणार आहे. शनिवारी रात्री उशिरा त्या दोघीवर कादवड येथे अत्यसंस्कार करण्यात आले.
मधुरा लवेल जाधव (16, पोसरे-खेड), सोनाली राजेंद्र निकम (16, कादवड) अशी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीची नावे आहेत. मधुरा व सोनाली या दोघी शनिवारी दुपारी 11.30च्या सुमारास कातकरवाडीपासून काही अंतरावर असलेल्या तिवरे नदीच्या पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. असे असताना बराच वेळ झाला तरी त्या घरी न परतल्याने यावेळी त्यांचे पालक या नदीपात्रात गेले असताना त्या दोघी बेशुध्द स्थितीत आढळल्या होत्या. त्या दोघींना उपचारासाठी दादर पाथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असता तत्पूर्वी मधुरा हिचा मृत्यू झाला होता. शिवाय सोनाली हिची थोडी धाकधुक सुरु असल्याने तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. हे दोन्ही मृतदेह कामथे रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. हा मृत्यू कोणत्या कारणातून झाला, याचे कारण अद्याप पुढे आले नसून पोलीस त्याचा शोध घेत असले तरी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर हे कारण स्पष्ट होणार आहे.
मधुरा व सोनाली या दोघी आकले मोहन विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होत्या. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘त्या’ मुलींच्या मृत्यूचे कारण तेव्हाच कळणार जेव्हा….
