दापोली:-दापोली येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जाहीर सभेत नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी मंत्री रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्याबद्दल चुकीचा शब्दप्रयोग करत टीका केली होती. त्याचा निषेध शनिवारी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दापोली येथे केला. तसेच सुषमा अंधारे यांना पुन्हा दापोलीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देखील महिला आघाडीकडून देण्यात आला.
त्याबरोबर घोषणा देत जाहीरपणे निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा संघटिका रोहिणी दळवी, समाजकल्याण माजी सभापती कामतेकर, तालुका संघटिका दिप्ती निखार्गे, माजी नगराध्यक्षा व महिला शहर संघटिका रसिका पेठकर, युवती शहर संघटिका किर्ती परांजपे, पंचायत समितीच्या माजी सभापती ममता शिंदे, नगरसेविका कृपा घाग, डॉ. शबनम मुकादम यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
उध्दव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा दापोलीत निषेध
