खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील पिरलोटे येथे 42 वर्षीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. झाकीर फंटू असे कामगाराचे नाव आहे. तो फिर्यादीकडे कामाला होता. कामाला आला नाही म्हणून त्याने त्याच्या घरी जावून दरवाजा वाजवला असता त्यांनी उघडला नाही. अखेर दरवाजा तोडला असता तो खाटवरून खाली पडलेला निदर्शनास आला. त्याला चिपळूण येथील एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केले. या बाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.