समाजभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले
रत्नागिरी:-श्रीमती अरुणा पाटील व श्री देवेंद्र पाटील यांनी १३ ऑक्टोबर १९९३ मध्ये भाकर सेवा संस्थेची स्थापना केली. समाजातील अनेक समस्या व प्रश्न यांना समोर ठेवून भाकर सेवा संस्था ही शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण या विषयांवर काम करते.आज पर्यंत भाकरने अक्षय प्रकल्प, कुळांच्या हक्कांसाठी काम , खाण कामगार यांच्या मुलांसाठी बालवाड्या,आधुनिक शेती प्रकल्प,महिला व मुलांकरिता विशेष सहाय्य कक्ष, गुजरात भूकंप मदत कार्य, सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास, जल जीवन मिशन, आजी आजोबांचा गाव, महिला पुनर्वसन केंद्र असे विविध सामाजिक प्रकल्प राबविले आहेत.
अशा या आपल्या भाकर सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र शासन यांचे वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेबाबत सन २०२०-२१ चा मानाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था )व तसेच २०२०-२१ मधील शाहू, फुले, आंबेडकर हा सुद्धा मानाचा पुरस्कार आमच्या भाकर सेवा संस्थेला प्राप्त झाला, हा पुरस्कार मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, सचिव भांगे साहेब, आयुक्त बकोरिया साहेब यांचे हस्ते मुंबई येथील NCPA सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे दि. १२/०३/२०२४ रोजी झालेल्या कार्यक्रमात प्रदान करणेत आला.