रत्नागिरी:-प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) अंतर्गत येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला ५ कोटींचे प्रकल्प अनुदान मंजूर झाले आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या उच्च शिक्षण विभागातर्फे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून महाविद्यालयांच्या सर्वांगीण प्रगती आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पीएम उषा (पूर्वीची राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान) पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेअंतर्गत राज्याला ५४० कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातून राज्यातील ४ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी, तर ७ विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटी रुपये मिळणार आहेत.
पीएम उषा योजनेतून रत्नागिरीतील गोगटे कॉलेजला पाच कोटीचे अनुदान
