आज लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आज निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. यासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशासह चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखाही निवडणूक आयोग जाहीर करणार आहे.
यासंबंधी निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात २० मे ला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.
2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील. आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू काश्मीर मधे देखील निवडणुका होतील. 97 कोटी मतदारांनी नोंद केली आहे. 54 लाखांपेक्षा जास्त EVM मशिन्स आहेत. मागच्या वर्षात 11 राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या. कोर्टाने आमच्यावर केलेल्या तिपणी देखील कमी झाल्या. फेक न्यूजला मोठ्या प्रमाणावर आळा घातला आहे, असे मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सर्व निवडणूक पक्षांसोबत चर्चा केली आहे. आम्ही महिला मतदारांवर जास्त भर दिला आहे. महिलांचा मतदानाचा वाटा वाढला आहे. महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी, शौचालय, व्हील चेअर या सगळ्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक मतदार केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था केली आहे. 85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतल जाणार आहे… एकाच वेळी देशात हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा करत आहोत, अशी माहितीही निवडणूक आयोग आयुक्तांनी दिली.