रत्नागिरी:-रत्नागिरीतील दाम्पत्याला न्यायालयाकडून केवळ 13 दिवसात घटस्फोट मंजूर करत असल्याचा निकाल देण्यात आल़ा अर्जदार पती-पत्नी हे याचीका दाखल होण्यापूर्वी दीड वर्षापासून विभक्त राहत होत़े त्यामुळे सहा महिन्यांचा कुलींग कालावधीचा विचार केला जावू नये अशी विनंती पती-पत्नी यांच्याकडून न्यायालयाला करण्यात आली होत़ी न्यायालयाकडून ही विनंती मान्य करत केवळ 13 दिवसात घटस्फोटाचा निर्णय दिल़ा.
रत्नागिरी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश संगीता सागर वनकोरे यांनी हा निकाल दिल़ा अर्जातील माहितीनुसार अर्जदार यांचा 11 मे 2016 रोजी विवाह झाला होत़ा वैवाहिक संबंधातून दोघांना एक मुलगा देखील झाल़ा. सुखी संसार सुरू असतानाच दोघांच्या संसरात मिठाचा खडा पडल़ा पती-पत्नीच्या संबंधामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल़े यातून 7 जुलै 2022 पासून दोघेही विभक्त राहूल लागल़े अर्जदार महिला ही आपल्या मुलासह माहेरी वास्तव्यास गेल़ी.
या कालावधीत नातेवाईक, ग्रामस्थ यांच्याकडून दोघांचीही समजूत काढण्याचा पयत्न करण्यात आल़ा मात्र या पयत्नांना कोणत्याही प्रकारे यश आले नाह़ी. अखेर दाम्पत्याकडून घटस्फोटासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आल़ा अर्जदार महिलेकडून पोटगीचा व पतीच्या जंगम मालमत्तेवरील हक्क सोडून देत असल्याचे न्यायालयापुढे सांगितल़े, तर पतीकडून मुलासाठी दरमहा 1 हजार रूपये पत्नीच्या खात्यावर जमा करणार असल्याचे सांगण्यात आल़े तसेच आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटण्याची परवानगी देखील न्यायालयाकडून महिलेच्या पतीला देण्यात आल़ी
अर्जदार दाम्पत्य हे परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याने व सहा महिन्यांपासून विभक्त राहत असल्याची बाब न्यायालयापुढे मांडण्यात आल़ी त्यासाठी सहा महिन्याचा कुलींग कालावधी माफ करून घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आल़ा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेल्या बाबींचा विचार करून न्यायालयाने दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केल़ा.