रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरट्याने लांबवल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 13 मार्च रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडल़ी. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांत चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे 13 मार्च 2024 रोजी तिरूनवेल्ली ते जामनगर एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होत़े. सकाळी 9.30 च्या सुमारास गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आल़ी. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरूद्ध भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केल़ा.