चिपळूण:-गोव्याहून नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसला आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याची घटना 14 रोजी मुंबई-गोवा महामार्गावर फरशीतिठा येथे घडली होती. या अपघातानंतर टेम्पोचालक न थांबता मुंबईच्या दिशेने निघून गेला. या प्रकरणी त्या अज्ञात टेम्पोचालकावर चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालक गोवा येथून नवी मुंबई येथे जात असताना मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथील फरशी तिठा येथे आला. यावेळी पाठीमागून येणाऱया आयशर टेम्पावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो बसगाडीच्या उजव्या बाजूने बाजू काढत असताना त्याने भरधाव वेगाने येऊन बसच्या उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातात बसेच्या दर्शनी भागाचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर आयशर टेम्पो चालक फरार झाला.