खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील भेलसई-गंगमथुरावाडी येथील एका गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर पोलिसांनी धाड टाकून 1450 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी सुभाष काशिराम कदम याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली. या धाडीत 25 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शिरिष अशोक साळुंखे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.