रत्नागिरी:-तालुक्यातील उक्षी येथे फवारणीचे औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 13 मार्च रोजी सकाळी 9.30 वा.घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनोद सखाराम रावणांग (44,रा.उक्षी चिंचवाडी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो त्याच्या घराच्या बाहेर बेशुध्द आणि मातीत माखलेल्या अवस्थेत पत्नीला दिसून आला. त्याच्या बाजुलाच फवारणीच्या विषारी द्रवाची बाटली दिसून आली. पत्नीने शेजार्यांच्या मदतीने पती विनोदला जाकादेवी येथील डॉ. पानगलेंकडे नेउन अधिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी विनोदला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.