रत्नागिरी:-कोकणातील पहिल्या सुसज्ज अशा जिल्हा पोलीस वसाहतीचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आह़े 14 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पोलीस मुख्यालय मैदान याठिकाणी हा कार्यक्रम होणार आह़े. यावेळी पालकमंत्री उदय सामंतं, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण खासदार विनायक राउत, सुनील तटकरे यांची पमुख उपस्थिती असणार आह़े, अशी माहिती जिल्हा पोलिसांकडून देण्यात आली आह़े
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासाठी गृह विभागाने सुमारे 123 कोटी 90 लाख रु.चा निधी मंजूर केला आहे. रत्नागिरी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवस्थानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. मात्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हा गेली अनेक महिने रखडलेला पश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पयत्नांची आता वचनपूर्ती होणार आहे. जिह्यातील सर्वात उंच टॉवर असलेली 15 मजल्याच्या 3 इमारती उभ्या राहणार आहे. त्यामध्ये तब्बल 222 फ्लॅटसह पोलीस अधिक्षक कार्यालय उभारण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालय याठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठी लगबग मागील दोन दिवसांपासून दिसून येत आह़े. कार्यक्रमाला विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे, पसाद लाड, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच विधानसभेचे आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ चे संदीप बिश्णोई, पोलीस महासंचालक रश्मी शुल्क, अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, जिल्हाधिकारी एम़ देवेंद्रसिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत़.