चिपळूण:-तालुक्यातील पोफळी नाका येथे जुगार चालवणाऱ्यावर अलोरे-शिरगाव पोलिसांनी कारवाई केल्याची घटना मंगळवारी घडली. त्याच्याकडून 575 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्ली ईस्माईल सय्यद (पोफळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सय्यद हा पोफळी नाका येथील देवांश मोबाईल शॉपीच्या पाठीमागील गल्लीत भिंतीच्या आडोशाला जुगार चालवत होता. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.