संगमेश्वर:-संगमेश्वर तालुक्यातील मौजे- पुर्ये तर्फे सावर्डे येथील कृष्णा विठ्ठल पाडावे यांचे मालकीच्या कोंबड्यांसाठी केलेल्या बंदिस्त खोलीमध्ये भक्षाच्या शोधात आलेल्या बिबट्या वनविभागाने जेरबंद केले.
मौजे-पुर्ये तर्फे सावर्डे येथील कृष्णा विठ्ठल पाडावे यांचे मालकीच्या कोंबड्यांसाठी केलेल्या बंदिस्त खोलीमध्ये भक्षाच्या शोधात बिबट्या अडकला असल्याचे पोलीस पाटील नयन दळवी यांनी वनपाल संगमेश्वर यांना पहाटे कळवले
त्यानुसार वनपाल यांनी परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी यांना कळवून रेस्क्यू टीम सह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली सदर बंद खोली 5 फुट रुंद व 5 फुट लांबीची असून सदर बंद खोलीमध्ये बिबट्या असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे त्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यासाठी नियोजन करून पिंजरा देवरुख वरुन 9 वाजता घटनास्थळी आल्यानंतर नियोजन केल्याप्रमाणे सदर बंदिस्त खोलीस असणाया दीड फुट बाय दोन फुट आकार असणाया खिडकीस पिंजरा लाऊन बंद केला. त्यांनंतर पिंज्रयाच्या दुस्रया बाजूने पाहेच्या सहाय्याने खिडकीच्या पट्टया तोडल्या. पट्टया तुटता क्षणीच बिबट्या खिडकीमधून पिज्रयामध्ये येऊन बंदिस्त झाला.
त्यानंतर सदर जेरबंद बिबट्या देवरुख येथे आणुन पशुधन विकास अधिकारी देवरुख डॉ. आनंदराव कदम यांचे मार्पत अमृता साबळे तहसीलदार संगमेश्वर(देवरुख) यांचे समक्ष जेरबंद बिबट्याची तपासणी केली तपासणी मध्ये तो नर जातीचा असुन अंदाजे वय 5 वर्षे आहे. तपासणी वेळी बिबट्याच्या अंगावर ताजी अगर जुनी कोणतीही जखम दिसून आली नाही. सुस्थितीत असल्याने जेरबंद बिबट्यास नैसर्गिक आधीवासात सोडण्यास योग्य असल्याचे सांगितले.
त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) .दीपक खाडे.सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण .वैभव बोराटे, परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक. निलेश बापट यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्यास नैसर्गिक आदिवासात मुक्त केले. व रेस्क्यू ऑपरेशन सुरक्षित पार पाडले.
सदर रेस्क्यू ऑपरेशनसाठी वनपाल संगमेश्वर शतौफिक मुल्ला वनरक्षक आकाश कडुकर ,अरुण माळी, सहयोग कराडे, विष्णु मांडवकर सरपंच पुर्ये तर्फे सावर्डे, नयन दळवी पोलीस पाटील, प्रभाकर दळवी, सुभाष चव्हाण, संतोष दळवी, व इतर ग्रामस्थांनी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडले.