रत्नागिरी:-कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिमगोत्सव. या शिमगोत्सवला उद्यापासून फाकपंचमी पासून सुरुवात होत आहे. 14 मार्च रोजी पहिल्या होळीचे सर्वत्र आगमन होणार आहे.
कोकण व शिमगा ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. येथील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी सणासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. कोकणात विशेषत: जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. अशा या शिमगोत्सवाला सोमवारी फाकपंचमीने प्रारंभ होणार आहे. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. त्यानंतर होळीपौर्णिमेला शिमग्यांची सांगता होणार आहे. फाकपंचमीला सर्वत्र गावातील वाड्या-वस्त्यांवर होळ्यांचे वाजत-गाजत आगमन होणार आहे. अनेक वाडी-वस्त्यांतील होळीच्या मांडावर आदल्या दिवशीच होळ्या आणून ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी विधीवत पूजाअर्चा करून होळी उभ्या करण्यात येणार आहेत.