खेड / प्रतिनिधी:- तालुक्यातील तिसंगी फाटा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या वणव्यात लागती झाडे जळून खाक झाली. यात मोठे नुकसान झाले. वणवा नेमका कुणी लावला, याचा उलगडा होवू शकला नाही. वणवा लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. मात्र उन्हामुळे आगीचा भडका उडून वणवा विस्तारत गेला. यामुळे डोंगरावरील गवतासह झाडींची राखरांगोळी झाली.