रत्नागिरी:-राज्य मंत्रीमंडळाने राज्यातील विविध कारागृहांमध्ये बांधकामांसाठी 53.1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश आहे.
राज्यातील ठाणे, येरवडा, अमरावती, यवतमाळ, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि रत्नागिरीतील विशेष कारागृहासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे येथे तृतीय पंथीयांसाठीचे राज्यातील पहिले विशेष कारागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 69 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. येरवडा जेलमध्ये बराकींची संख्या वाढवण्यात येणार असून अमरावती मध्यवर्ती कारागृहात अधिकारीवर्गासाठी निवास व्यवस्था उभारणे प्रस्तावित आहे. रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आवश्यक बांधकामासाठीही या निधीचा विनियोग होणार आहे.
राज्यातील विविध कारागृहासाठी 53 कोटींचा निधी, रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश
