खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खासगी आराम बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारचया सुमारास घडली. प्रसाद मारोतराव गुरनुले (54, नवी मुंबई) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.
ते सानपाडा येथे जाण्यासाठी नवलाई ट्रॅव्हलमधून (एम.एच. 08/ए.पी. 9476) प्रवास करत होते. बस कशेडी घाट चढत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
बसमधील प्रवाशांनी उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराचया तीव्र झटक्याने मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानुसार येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.