दर महिन्याला नामांकित कर्करोग तज्ञांकडून सल्ला घेण्याची संधी
चिपळूण (प्रतिनिधी) : कॅन्सर होऊन मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे. कॅन्सरविषयक अज्ञान, गैरसमज, भीती, अशिक्षितपणा ही याची प्रमुख कारणे आहेत. परंतु कॅन्सर होऊ नये यासाठी आवश्यक त्या तपासण्या वेळच्या वेळी केल्या तर कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. त्यामुळे कॅन्सर झाल्यानंतर त्याच्याशी लढण्यापेक्षा तो होऊ नये याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी चिपळूणच्या ऑन्को लाईफ केअर सेंटरमध्ये दर महिन्याला अनुभवी कर्करोग तज्ज्ञांचा ओपीडी सुविधेचा लाभ धेता येणार आहे. दर महिन्याला नामांकित कर्करोग तज्ञांकडून सल्ला घेण्याची संधी या ओपीडी सुविधेच्या माध्यमातून मिळणार आहे. मार्च महिन्यातील यशस्वी ओपीडी सुविधेनंतर येत्या २१ एप्रिल रोजी नागरिकांना पुन्हा एकदा ओपीडी सेवेचा लाभ घेता येणार आहे.
यासाठी पुर्व नोंदणी करणे आवश्यक असून सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याठिकाणी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॅा विक्रम घाणेकर, हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन डॅा अद्वैत गोरे, रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट डॅा वसीम फोपळूणकर अशा नामांकीत तज्ज्ञांना सल्ला याठिकाणी घेता येणार आहे. पुर्व नोंदणीसाठी ७३७८९५८०००, ९४०४२४०७६२ येथे संपर्क साधावा.
चिपळूणच्या ऑन्को लाईफ केअरमध्ये मिळणार अनुभवी कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची सुवर्णसंधी
