रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ च्या मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी येथील मुलींच्या ‘सागरकन्या’ वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी “आरोग्य व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण” कार्यक्रमाचे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वयंसिद्धा (NGO) च्या संस्थापक व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती. श्रद्धा कळंबटे आणि डॉ. तेजल चवंडे या उपस्थित होत्या.
घरापासून दूर रहात असताना विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? कोणता आहार घ्यावा? या विषयी डॉ. तेजल चवंडे यांनी मार्गदर्शन केले. तर श्रीमती. श्रद्धा कळंबटे यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपले ध्येय निश्चित करणे, आपणंच आपली मदत करणे व मत्स्य क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार सुरू करण्याचे विद्यार्थिनींना आवाहन केले.
या वर्षीचा जागतिक महिला दिन “Invest in Women: Accelerate Progress ” या घोषवाक्यावर आधारित असल्याने डॉ. सुधाकर इंदुलकर, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींचे आरोग्य व उद्योजकता यावर भर देत भविष्यातील गरज जाणून सदर विषया वरील कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. स्वप्नजा मोहीते, सहाय्यक ग्रंथपाल सौ. मनिषा सावंत व प्रा. डॉ. वर्षा भाटकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाकरिता प्रा.डॉ. संगीता वासावे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वसतिगृह पर्यवेक्षक सौ. अपुर्वा सावंत व वसतिगृह प्रमुख डॉ. जयप्पा कोळी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमामध्ये वसतिगृहातील ६० विद्यार्थिनीनी प्रत्यक्ष आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कु. प्रतिक्षा निंबर्टे या विद्यार्थीनीने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.