चिपळूण:-चूल पेटवत असताना परिधान केलेल्या गाऊनला आग लागल्याने यात भाजलेल्या वयोवृध्द महिलेचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यापकरणी सावर्डे पोलीस स्थानकात रविवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंजुळा रामचंद्र सुर्वे (75, वीर) असे मृत्यू झालेल्या वयोवृध्द महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुळा सुर्वे या 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी चूल पेटवत असताना त्यांनी परिधान केलेल्या गाऊनला लाग लागली. यात त्या गंभीररित्या भाजल्या. त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.