रत्नागिरी:-ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या महिला विभागाच्या जिल्हाअक्षपदी नसीमा डोंगरकर तर रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी वहिदा काझी यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हयातील मुस्लिम समाजातील इतर मागास वर्गीयांचे अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन नेहमीच पुढे राहिली आहे. ओबीसीचे प्रश्न सोडवित असतानाच संघटन वाढीलाही महत्व देण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशचा महिला विभागाचे पदाधिका-यांच्या नेमणूक्त करण्याचे कार्य जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यानी हाती घेतले आहे. त्यासाठीच जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी महिला विभाग जिल्हाध्यक्ष आणि रत्नागिरी तालुकाध्यक्षा पदाची निवड जाहीर केली आहे. महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नसीमा डोंगरकर यांची निवड करण्यात आली. डोंगरकर या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सदस्या आहेत. त्या सतत सामाजिक, राजकीय कार्यात कार्यरत आहेत. तसेच रत्नागिरी शहरातील सामाजिक कार्यकल्यौ आणि कोकण हेल्पलाईनच्या अध्यक्षा वहिदा काझी यांची रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीनंतर त्यांनी मुस्लिम समाजातील महिलांचे प्रश्न हाती घेण्याचा निश्चय केला आहे. या नियुक्तीनंतर डोंगरकर आणि काझी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या नियुक्तीच्या वेळी जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन, जिल्हा सरचिटणीस रहिम दलाल, तालुकाध्यक्ष निसार राजपूरकर, जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटीचे कार्याध्यक्ष इम्रान सोलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.