दापोली:-दापोली तालुक्यातील सोंडेघर येथील 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली.
बबन भिकू मर्चंडे असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन मर्चंडे यांना अचानक दम लागला. दम जास्त प्रमाणात लागल्याने त्यांना रिक्षाने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येत असताना रस्त्यातच बबन मर्चंडे यांचा श्वास थांबला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासाअंती त्यांना मृत घोषित केले. या बाबत पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.