देवरुख:-देवरुखचे सुपुत्र सन्मुख कोळेकर हे आपल्या बाईकने अयोध्येकडे रवाना झाले. दहा दिवसात ते देवरुख -अयोध्या- देवरुख असा सुमारे 4500 कि.मी.प्रवास करणार आहेत.
देवरुखवासियांतर्फे शुभेच्छा देण्यासाठी हॉटेल पार्वती येथे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी छोटेखानी समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी देवरुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, भूमीअभिलेखचे संतोष भागवत, रंजना कदम,माधवी दिदी,दिपा प्रभावळकर,सागर मुळ्ये,राजेश राजवाडे,कल्पना कोळेकर व मिञमंडळ उपस्थित होते. युयुत्सु आर्ते यांनी सांगितले की अयोध्येला अनेकजण जात आहेत,माञ कोकणातुन बाईकने प्रवास करणारे कोळेकर हे एकमेव आहेत.त्यांना प्रवासाची आवड आहे यामुळे ते हा प्रवास चांगला पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.
सन्मुखने मिञमंडळींच्या शुभेच्छा सोबत घेवून मी अयोध्येला जात आहे.असेच माझ्यावर कायम प्रेम राहु दे अशा भावना व्यक्त केल्या व अयोध्येकडे प्रयाण केले.
देवरुखचे सन्मुख कोळेकर बाईकने अयोध्येकडे रवाना
