रत्नागिरी:-हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. हे थांबले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांचे संघटन, त्यांच्या समस्या सोडविणे, सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 10 मार्च 2024 महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन रत्नागिरीत होणार आहे.
यांसदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने शुकवारी रत्नागिरी पत्रकार परिषद पार पडली. सरकारीकरण झालेल्या मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि सवंर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरातील धर्मकार्य यांव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक आणि हिंदू जनजागृती समिती चे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही. तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
सरकारीकरण झालेल्या मंदिरातील पैसा हा मंदिराचे व्यवस्थापन, मंदिर संस्कृतीचे जतन आणि सवंर्धन, पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरातील धर्मकार्य यांव्यतिरिक्त अन्यत्र वापरला जात आहे. हे थांबले पाहिजे तसेच मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यांचे संघटन, त्यांच्या समस्या सोडविणे, सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या नियंत्रणात देणे, अशा विविध विषयांच्या अनुषंगाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मार्च 2024 या दिवशी ‘श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय, एमआयडीसी, रत्नागिरी’ येथे एक दिवशीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली.
“या परिषदेला रत्नागिरी जिह्यातील 400 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवत्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत. यात मुख्यत्वेकरून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू सत्यवान कदम, माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, पुणे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनिल घनवट, मंगळग्रह संस्थान, अंमळनेरचे अध्यक्ष दिगंबर महाले, अनुपजी जैस्वाल, देवस्थान सेवा समिती विदर्भ सचिव (अमरावती), हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवत्ते रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या पत्रकार परिषदेला श्री मंगळग्रह संस्थान, अंमळनेरचे अध्यक्ष दिगंबर महाले, श्री अंबामाता मंदिर खेडशीचे विश्वस्त आणि श्री मरुधर विष्णू समाज सेवा समितीचे समन्वयक दीपक देवल, श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान, राजीवडाचे सचिव देवेंद्र झापडेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे उत्तर रत्नागिरी समन्वयक सुनील सहस्त्रबुद्धे आणि हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी आदीं उपस्थित होते.
या मंदिर अधिवेशनामध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी, दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. हे मंदिर न्यास अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी आहे. अन्य कोणाला सहभागी व्हायचे असल्यास 9422050560, 8983265759 या क्रमांकांवर संपर्प साधून रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू जनजागृती समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.