चिपळूण:-पालवण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासह बचतगटाच्या महिलांनी बेकायदा सुरु असलेल्या दारु विक्रीप्रश्नी सावर्डे पोलीस स्थानकात काही दिवसांपूर्वी पत्र दिले होते. तरीही छुप्या पध्दतीने बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांवर पोलिसांसह महिलांनी संयुक्तपणे धडक देत दारूधंदे उध्दवस्त केले. विशेष म्हणजे धडक देतेवेळी महिलासह पोलीस येताच दारु विक्रेत्यांनी ढुंगणास पाय लावून पळ काढला. याप्रकरणी दोघा दारु विक्रेत्यांवर सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनित अविनाश झिंगे (पालवण, भाऊसाहेब नगर), नारायण संभाजी पंडीत (तुरंबव-सहाणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याबाबतची फिर्याद साक्षी संतोष चव्हाण (32, पालवण), अश्विनी अरुण पांचाळ (पालवण) यांनी दिली आहे.
पालवण ग्रामपंचायतीच्या हद्दीत देशी-विदेशी तसेच गावठी दारु व ऑनलाईन लॉटरी विनापरवाना धंदे सुरु असल्याने संबंधित व्यवसायिकांवर कारवाई करावी यासाठो पत्र पालवण ग्रामपंचात तसेच महिला बचत गटाच्या महिलांनी सावर्डे पोलीस स्थानकांला दिले होते. या मागणीनुसार सावर्डे पोलिसांकडून दारुविक्रेत्यावर कारवाई देखील केली होती. तरी देखील पालवण ग्रामपंचायतीच्या हद्दीत छुप्या पध्दतीने देशी-विदेशी तसेच गावठी दारुची विकी सुरु असल्याच्या तकारी पुढे आल्या होत्या. असे असताना सोमवारी सरपंच अश्विनी पांचाळ, महिला बचत गट सदस्या अश्विनी भुवड, उपसरपंच गणेश विचारे, पूजा भुवड, अंजली पानगरे, रिया भुवड, नेहा मोहिते, सुजाता पवार, दिक्षा साठले, सायली म्हापार्ले, अश्विनी भुवड, ग्रामपंचायत सदस्य पविण सावर्डेकर, संतोष भुवड, पोलीस पाटील पशांत राजेशिर्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे हे संयुक्तपणे पालवण येथे गेल्यानंतर भाऊसाहेब नगर येथे सुमित झिंगे खोपटीच्या समोर उघड्या पडवीत गावठी दारुचे कॅन व साहित्य घेऊन दुपारी 3 वाजता विक्रीसाठी बसलेला होता. मात्र महिलासह पोलीस येत असल्याची चाहूल लागताच झिंगे हा तेथेच दारुचे साहित्य टाकून पसार झाला. पोलिसांनी 15 लिटर 800 रुपये किंमतीची गावठी दारु व अन्य साहित्य असे 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच नारायण पंडीत हा पालवण सॉ मिल समोर पंडीत यांच्या दुकानाच्या गाळ्यात देशी-विदेशी दारु विनापरवना विक्री करत असताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी 9 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यापकरणी त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.