खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील चींचघर-प्रभुवाडी येथे झालेल्या दुचाकी व रिक्षा अपघातात स्वत: च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी महिलेसह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेकडे दुचाकी चालवण्याचा परवाना देखील नव्हता, असेही तकारीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल विरेंद्र आंबेडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार एका महिलेसह सुनील शिवराम सकपाळ (तिसे) यांयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.