जिल्हास्तरावर दापोलीची जि.प.शाळा कर्दे
रत्नागिरी:-राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा निकाल जाहीर झाला आहे. विविध गटांमधील हा निकाल शाळांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातीलही विभागस्तरीय व जिल्हास्तरीय शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला. या उपक्रमातून शाळांच्या बाह्य घटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले. या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर 45 दिवस सुरु होते. त्यानंतर केंद्र, तालुका व जिल्हा विभाग व राज्य स्तरावरुन या अभियानाअंतर्गत सहभागी शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनाचा विभाग व राज्य स्तरावरील निकाल पुढीलपमाणेः
विभागस्तरीय निकाल- शासकीय गटात जि.प.पूर्ण पाथमिक शाळा मुंढे तर्फे चिपळूण पथम कमांक पटकावला आहे. तर खासगी गटात विभागस्तरावर न्यू इंग्लिश आणि ज्युनिअर कॉलेज सावर्डे ने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
जिल्हास्तरीय निकाल- शासकीय गटात जिल्हास्तरावर जि.प.शाळा कर्दे (दापोली) प्रथम कमांक, जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबेकरवाडी (रत्नागिरी) ने दुसरा क्रमांक तर जि.प.प्राथमिक शाळा हातीव नं.1 (संगमेश्वर) ने तृतीय कमांक पटकावला आहे.
जिल्हास्तरीय खासगी शाळा गटात जिल्हास्तरावर रत्नागिरी शहरातील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवरुखच्या न्यू इंग्लिश स्कूल व गुरूवर्य काकासाहेब सप्रे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ने द्वितीय क्रमांक पटकाला तर राजापूर हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळवला आहे.