दापोली:-दापोली तालुक्यातील दाभोळ घाणा वाकण रोड येथे नुकताच अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र मदन कदम (60, भंडारवाडा, दाभोळ) हे रविवारी दुपारी 3.20 वाजण्याच्या सुमारास घाणा वाकण येथील जंगलमय भागात संशयितरित्या आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे हातभट्टीची दारू बिगर परवाना बाळगलेल्या स्थितीत आढळून आली. त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(इ) नुसार कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांदिवली येथेही रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मांदिवली ते मांदिवली बाईतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडीझुडपाच्या आडोशाला नवल रघुनाथ वेदपाठक (39, मांदिवली बाजारपेठ) हा देशी दारूच्या 22 बाटल्या विनापरवाना विक्री करण्याकरता ताब्यात बाळगल्याच्या स्थितीत आढळून आला. वेदपाठक याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.