दापोली:-केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सुर उमठू लागला असून त्याचे पडसाद दापोली विधानसभा मतदार संघात दिसू लागले आहेत. भाजपा आणि शिंदे गटातील पक्षाचे कार्यकर्ते हे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातून बाहेर पडत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठया संख्येने जाहीर प्रवेश करू लागले आहेत त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बाजूने दापोली विधानसभा मतदार संघात वातावरण तयार होवू लागल्याने हा शिवसेना पक्षासाठी शुभ संकेत मानला जात आहे तर सत्ताधाऱ्यांना ही धोबी पछाड असल्याचे दापोलीतील नाक्या नाक्यावर खुलेआम चर्चा सुरू आहे.
दापोली विधानसभा मतदार संघातील खेड या तालूक्यातील फुरूस या लोकसंख्येने मोठया असलेल्या गावातील नुकत्याच झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील मोठया पक्ष प्रवेशनंतर शनिवारी दुस-याच दिवशी दापोली तालूक्यातील हर्णे आणि अडखळ जईकर मोहल्ला या महसुली गावातील शेकडो शिंदे गटातील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सध्या असलेल्या आप आपल्या पक्षाला सोड चिठ्ठी देत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात माजी आम. संजय कदम यांच्या नेर्तृत्वावर विश्वास व्यक्त करत माजी जि.प. अध्यक्ष तसेच युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य विक्रांत भास्करशेठ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्णे येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केल्याने केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाला बसलेली ही मोठीच चपराक मानली जात आहे.
दापोली तालूक्यातील हर्णे या गावासह अडखळ जुईकर मोहल्ल्यातील शिंदे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी भाजपात कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात हर्णे येथील बारावाडीच्या सभागृहात जाहीर प्रवेश केल्याने या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटासह भाजपाला माेठे भगदाड पडले आहे. याचा परिणाम हा सत्ताधारी पक्षाची निवडणुकीतील मतांची टक्केवारी घसरण्यात होणार आहे. दापोली तालूक्यातील हर्णे जिल्हा परिषद गटातील हर्णे या गावातील बाजार मोहल्ला नवानगर आणि हुसेनपूरा येथील भाजपा शिंदे गटाच्या कार्यकर्त्य़ासह केळशी जिल्हा परिषद गटातील अडखळ आणि जुईकर मोहल्ला या महसुली गावातील इरफानियाॅ मोहल्ला तसेच जुईकर मोहल्ला येथील राष्ट्रवादीसह शिंदेगटातील इक्बाल शिरगावकर,जसीम जाक्कर,अफान बालाभाई, रिहान वाकणकर, दाऊद शिरगावकर, अजिम कोंडविलकर,इम्तीयाज काजी,शहीदा पटेल, अदान वाकणकर मुझजाम सोलकर,अफान परकार, मोकीद काजी,अलिफ काजी, नावेद काजी, सामी काजी,उमर खान, बिलाल संगमेश्वरी, मोहमद पावसकर,सईफ म्हालदार,मविन महालदार,शौकत महालदार, मुक्तार संगमेश्वरी,अजिम पावसकर, अदिल मिरकर,माजीद मिरकर,फैमिदा आडेकर,फातिमा मुकादम,शमिम कुरवाले,नजराना मुकादम,निरोफर काळावे, तस्लीम खान, मेहरान कोंडविलकर, सद्दाम हुनेरकर, रूबीना शादुल्ला,नुहीद मिरकर,एम. खलिफ मजगावकर आदी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आम. संजय कदम, माजी जि.प. अध्यक्ष आणि युवासेना राज्य कार्यकारी सदस्य विक्रांत जाधव, युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, उप जिल्हा महिला संघटीका मानसी विचारे, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, बिलाल म्हाळूनकर, विश्वास कदम, अजय घाडगे, रमेश गोवले, प्रकाश मोरे, अनंत बांद्रे, विनोद पतंगे,नईम हुनेरकर, संदेश चोगले, बंटी बंगाल, आशिष घाडगे, विजय बाक्कर, अजित दुबळे, योगेश महाडीक आदींसह पदाधि-यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी अध्यक्ष विक्रात जाधव तसेच माजी आम.संजय कदम यांनी सत्ताधारी भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षाच्या बदलत्या भुमिकेवर चांगलेच आसुड ओढले.
दापोलीत महायुतीला मोठा दणका, तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
