नवी मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर-सेनापुरा विभागादरम्यान गुरुवार, ७ मार्च रोजी कोकण रेल्वेने तीन तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या एका नियमित गाडीच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे.
त्याचप्रमाणे इन्नांजे-नंदीकुर विभागादरम्यान दुपारी १२:१५ ते २:१५ वाजेदरम्यान दोन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या विभागातून धावणाऱ्या दोन गाड्या रद्द केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
मुर्डेश्वर -सेनापुरा विभागामधील मालमत्तेच्या देखभाल- दुरुस्तीसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू – मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा ३ मार्च रोजी सुरू होणारा प्रवास कुंदापूर स्थानकावर काही वेळासाठी थांबविण्यात येईल, तर कुंदापुरा-मुर्डेश्वर विभागादरम्यान रद्द होईल. त्याचप्रमाणे मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू एक्स्प्रेसचा ७ मार्च रोजी कुंदापुरा स्थानकातून नियोजित वेळेत सुटेल; मुर्डेश्वर-कुंदापुरा विभागादरम्यान रद्द हाेईल. कोचुवेली-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस मंगळुरू जंक्शनवर ६० मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक
