राजापूर:-तालुक्यातील वाळवड येथे सख्ख्या भावावर कुऱ्हाडने वार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजूरी व 3 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी. तुकाराम बाबाजी गुरव (42, ऱा वाळवड त़ा राजापूर) असे आरोपीचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध राजापूर पोलिसांकडून दोषारोपपत्र ठेवण्यात आले होत़े. रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस़ एस़ गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा.
गुह्यातील माहितीनुसार तुकाराम गुरव व तक्रारदार राजेंद्र गुरव यांच्यात घरातील म्हशींचे दुध कुणी काढायचे यावरून वाद निर्माण झाला होत़ा. 30 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 3.30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हे घराशेजारी असलेल्या गोठ्यामध्ये दुध काढण्यासाठी गेले असता तुकाराम हा त्याठिकाणी आल़ा. तसेच या म्हशी माझ्या असून त्यांचे दुध तू काढायचे नाहीस असे बोलू लागल़ा. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल़ा दरम्यान राजेंद्र यांनी म्हशींचे दुध न काढता तसेच त्यांना सोडून दिल़े.
या गोष्टीचा राग आल्याने तुकाराम याने घरातील काठी आणून राजेंद्र याला मारहाण करण्यास सुरूवात केल़ी. तसेच त्यानंतर तुकाराम हा पुन्हा घरामध्ये जावून कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी आल़ा. रागाने बेफाम झालेल्या तुकाराम याने राजेंद्र याच्या डोक्यावर व पाठीवर कुऱ्हाडीने वार केल़े, अशी तक्रार राजेंद्र याने राजापूर पोलीस ठाण्यात दाखल दिली. त्यानुसार पोलिसांनी तुकाराम याच्याविरूद्ध भादंवि कलम 307,504,506 नुसार गुन्हा दाखल केल़ा. तसेच गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केल़े.
न्यायालयापुढे राजेंद्र याच्याविरूद्धचे आरोप शाबीत झाल्याने त्याला 10 वर्षे सक्तमजूरी व 3 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी. सरकार पक्षाकडून एकूण 7 साक्षिदार तपासण्यात आल़े पैरवी म्हणून राजापूर पोलीस ठाण्यातील किरण सपकाळे यांनी काम पाहिल़े.
राजापुरात सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या भावाला 10 वर्षे सक्तमजूरी
