क्रेनखाली सापडलेल्या चालकाला दोन तासाच्या प्रयत्नांनी काढले बाहेर
चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात कुत्र्याला वाचवताना पेन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ऑपरेटर गंभीर झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 12 वाजण्याया सुमारास घडली.
अपघातग्रस्त क्रेन ही महामार्गाच्या परशुराम ते खेरशेत या चितपळूण टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा कंपनीची आहे. ऑपरेटर सोनू (28, बिहार) हा सावर्डेहून चिपळूणकडे जात असताना कामथे घाटात कुत्रा आडवा आला. त्याला वाचवताना क्रेन थेट रस्त्यावरून दरीत कोसळली. कोसळलेल्या क्रेनखाली ऑपरेटर सोनू अडकला. घटनास्थळी रूग्णवाहीका, डेरवण रूग्णालयाचे वैद्यकीय पथक दाखल झाले. पोलीसही दाखल झाले.
दरम्यान, क्रेनखाली अडकलेल्या ऑपरेटरला बाहेर काढण्यासाठी दुसरी क्रेन उपलब्ध होत नव्हती. तब्बल दोन तासानंतर क्रेनखाली अडकलेल्या ऑपरेटरला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे.
कुत्र्याला वाचवताना क्रेन दरीत कोसळली
