संतोष पवार/जाकादेवी:-रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी येथे रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील राहणाऱ्या महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महिलांना आणि युवकांच्या करिअरच्या दृष्टीने युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिला महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे शनिवार दि.२ मार्च रोजी दु. ४ ते सायंकाळी ७ या वेळेत रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी येथे मार्गदर्शनासाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
निलेश भगवान सांबरे हे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व असून त्यांनी ठाणे, पालघर जिल्हृयांत कंट्रक्शन क्षेत्रामध्ये फार मोठी उंची गाठलेली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले निलेश सांबरे यांनी समाजपयोगी केलेली कामे उल्लेखनीय आहे.यामध्ये दिव्यांग मुले, अंध मुले, मतिमंद मुले यांच्यासाठी निवासी शाळा उभारल्या आहेत.एवढेच नव्हे तर रायगड ,पालघर, ठाणे जिल्ह्यांत आदिवासी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी झडपोलीत सीबीएससी स्कूल इंग्लिशच्या माध्यमातून विशेष विज्ञान, कला ,वाणिज्य महाविद्यालय उभी केली आहेत.
संस्थेच्या माध्यमातून मागासलेल्या व बहुजन समाजातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, वकील, न्यायाधीश व विविध शासकीय पातळीवर पोहोचले आहेत. भिवंडी शहापूर या ठिकाणी देखील त्यांनी सीबीएससी बोर्ड शाळांची सुरुवात केली आहे. नीट,जीई अभ्यासक्रमाचे ते वर्ग चालवत आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरण व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धांविषयी ते स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे येणार आहेत. या कार्यक्रमाला श्री.सांबरे स्वतः येत असल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील महिला,युवक, कुणबी व बहुजन समाजातील होतकरू विद्यार्थी यांनी पालकांसह उपस्थित रहावे ,असे आवाहन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले युवा नेते प्रथमेश गावणकर, निलेश अवेरे, प्रविण डावल ,नंदकुमार कुवार यांनी केले आहे.या मार्गदर्शनासाठी वाहनांची सोय मोफत करण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले.