चिपळूण:-जिल्ह्यात सगळीकडे बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. घर परिसरातून कुत्रे, मांजर, कोंबड्या मारण्याचा घटना घडत आहे. चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील अनंत खरात यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने वासराला ओढत नेत ठार केल्यी घटना मंगळवारी घडली.
गोठ्यात वासरू नसल्याचे खरात यांच्या लक्षात येता त्यांनी शोध सुरू केला. यावेळी जंगलात मृतावस्थेत वासरू दिसून आले. बिबट्याने त्याच्या मानेचा व शेपटाकडील भाग खाल्ल्याचे दिसून आहे. बिबट्याच्या वावराने भीतीने वातावरण पसरले आहे.
चिपळुणात बिबट्याने गोठ्यात शिरून वासराला केले ठार
