रत्नागिरी:-मानलेल्या बहिणीशी एका तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भावाने एका तरूणाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना रविवारी रात्री 12.30च्या सुमारास माळनाका येथील मराठा हॉलसमोरील जागेत घडल़ी. आकाश तुषार शिंदे (24, ऱा नाचणे रत्नागिरी) असे मारहाण करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आह़े. आकाश याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा. अक्षय गुरव (25, ऱा कसोप रत्नागिरी), सुरज पवार, सुमित सावंत देसाई व अन्य अक्षय गुरव याचा मित्र अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय गुरव याच्या मानलेल्या बहिणीशी आकाश शिंदे याचे काही वर्षापासून हे प्रेमसंबंध सुरू होत़े मात्र या प्रेमसंबंधात काही कारणामुळे मिठाचा खडा पडल्याने वितुष्ठ निर्माण झाले होत़े. यातूनच अक्षय गुरव व आकाश शिंदे यांच्यात वाद उफाळून आला होत़ा.
काही महिन्यांपूर्वी या दोघांमधील वादाचा समेट घडवूनही आणला असल्याची माहिती समोर आली आह़े. मात्र पुन्हा वादाची ठिणगी पडल्याने 25 फेबुवारी 2024 रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास अक्षय व आकाश यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवल़े यासाठी मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असलेल्या माळनाका येथील मराठा हॉल येथील जागा निश्चित झाल़ी. ठरल्याप्रमाणे रात्री 12.30 च्या सुमारास आकाश हा आपल्या दोन मित्रांसह त्या ठिकाणी आल़ा तर अक्षय गुरव हा देखील आपल्या चौघा मित्रांसह त्या ठिकाणी उपस्थित झाल़ा. यावेळी दोघांमध्ये चर्चेला सुरूवात झाली असता वाद पेटत गेल़ा. यातून अक्षय गुरवने आपल्या मित्रांच्या मदतीने आकाश याला शिवीगाळ व हाताच्या थापटाने मारहाण करण्यास सुरूवात केल़ी तसेच अक्षयचा मित्र सुमित सावंत देसाई याने हातातील लोखंडी हत्याराने आकाश याच्या डोक्यात वार केल़ा. या हत्याराचा वार वर्मी लागल्याने आकाश याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्याने आकाश याचा चेहरा रक्ताने माखून गेल़ा. आकाशला मारहाण केल्यानंतर अक्षयने त्या ठिकाणाहून पोबारा केल़ा. दरम्यान आकाशने आपल्याला मारहाण करण्यात आल्याचे आपल्या नातेवाईकांना कळविल़े. यानंतर क्षणाचाही अवधी न दवडता आकाशच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतल़ी. आकाशला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नातेवाईकांची भंबेरी उडाल़ी. आकाशच्या नातेवाईकांनी लागोलाग त्याला जिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केल़े. रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आकाशने मारहाण प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अक्षय व अन्य तिघांविरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
रत्नागिरी माळनाका येथे प्रेमप्रकरणातून तरूणाला मारहाण, चौघांवर गुन्हा
