रत्नागिरी काळबादेवी येथील घटना
रत्नागिरी:-तालुक्यातील काळबादेवी येथे क्रिकेट सामन्यावेळी बॅटिंग करू न दिल्याचा राग मनात ठेवून तरूणाला मारहाण केल्याची घटना रविवारी काळबादेवी पाथरदेव मैदान येथे घडल़ी. साई रवींद्र बनप (25, ऱा काळबादेवी, बनपवाडी) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आह़े. साई याने ग्रामीण पोलिसांत मारहाण प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा. सुमित सुधीर भोळे (ऱा काळबादेवी भोळेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई व सुमित हे एकाच गावात राहणारे असून काळबादेवी पाथरदेव मैदान या ठिकाणी क्रिकेटचा सराव करत असतात़. काही दिवसांपूर्वी सड्ये येथे झालेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान साई बनप हा कर्णधार असताना सुमित याला जाणीवपूर्वक बॅटिंग करू दिली नाही, असा संशय सुमित याच्या मनात धुमसत होत़ा. काळबादेवी पाथरदेव मैदान येथे 25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास साई हा सराव करत होत़ा. यावेळी सड्ये येथे बॅटिंग करू न दिल्याचा राग मनात ठेवून सुमित याने साई याला विचारणा केल़ी. यातून वाद निर्माण झाल्याने सुमित याने साई याला शिवीगाळ करून लाकडी बॅटने मारहण केली, अशी तक्रार साई याने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी सुमित याच्याविरूद्ध भादवी कलम 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केल़ा.